। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी (दि.17) राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, ‘वोट जैसे कुछ नही, वोट जरूर डालेंगे हम’ या निवडणूक आयोगाने दिलेल्या घोषवाक्यानुसार विद्यार्थिनींनी साकारलेल्या रांगोळीच्या माध्यमातून मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला. यावेळी या विद्यालयातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांची मतदान नोंदणी करण्यात आली. बोर्लीपंचतन मंडळ अधिकारी सुनील पाटील व जनता शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक संदिप पाटील यांनी मतदानाच्या अधिकाराचे लोकशाहीत असलेल महत्व, तो हक्क बजावल्याने काय परिणाम होऊ शकतो, मतदारांची भूमिका कशी महत्त्वाची ठरु शकते, मतदान करणे जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. त्यामुळे देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे याबाबत मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाला दिघी तलाठी आदित्य धनावडे, मुस्लिम समाज उपाध्यक्ष सलील अंतुले, अनंत मेंदाडकर, रघुनाथ नागवेकर, सेवानिवृत्त कोतवाल विनोद लाड आणि बहुसंख्य पालक उपस्थितीत होते.