वाहतूक पोलीस उपनिरीक्षक नरेश नांदगावकर यांचे आवाहन
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात राष्ट्रीय रस्ते विकास अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून वाहनचालक यांना वाहतुकीचे नियम यांची माहिती देणारे फलक नेरळ पोलीस ठाणे हद्दीत लावण्यात आले आहेत. या वाहतूक सूचना फलकाच्या माध्यमातून गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये, असे आवाहन पोलीस उप निरीक्षक नरेश नांदगावकर यांनी केले आहे.
रायगड पोलीस जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. 2025 अंतर्गत वाहन चालवताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे यावर माहिती देणारे फलक नेरळ पोलीस ठाणे हद्दीत लावले जात आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उप निरीक्षक नरेश नांदगावकर यांनी वाहनचालक यांनी कोणती काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन करणारे फलक लावले आहेत. नांदगावकर यांनी वाहनचालकांना मार्गदर्शन करताना मोबाईलचा वापर टाळावा जेणेकरून वाहने चालवीत असताना होणारे अपघात टळू शकतात, असे सांगितले आहे.