। पाली । वार्ताहर ।
नृत्य दिग्दर्शक अविनाश झोरे व आदित्य झोरे प्रस्तुत ओम साई डान्स अकॅडमीची उत्कृष्ट नृत्यांगना श्रीजा संदेश पाटील हिने वडोदरा गुजराथ येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावेळी डान्स इंडिया डान्स फ्रेम कमलेश पटेल यांच्या हस्ते श्रीजाला सुवर्ण पदक, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तिच्या या यशाने सुधागडासह जिल्ह्यात तिच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सुधागड तालुक्यातील ओमासाई डान्स अकॅडमीचे विद्यार्थी नृत्यक्षेत्रात घवघवीत यश प्राप्त करत असून नृत्य दिग्दर्शक अविनाश झोरे, आणि नृत्य दिग्दर्शक आदित्य झोरे यांच्या प्रयत्नांना यश देण्याचे काम अॅकडमीचे विद्यार्थी करत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय प्रत्येक स्तरावर सुवर्ण कामगिरी करत पाली सुधागडसह रायगडचे नाव उंचावण्याचे काम अकॅडमीचे विद्यार्थी करत आहेत.