भारताकडून सर्वोत्तम कामगिरीची नोंद
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेश याने फिडे (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना) क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच त्याने 2784 रेटिंगची कमाई करीत भारताकडून सर्वोत्तम कामगिरीचीही नोंद केली आहे. याचसोबत त्याने भारताच्या अर्जुन एरीगेसी याला मागे टाकले आहे. अर्जुन याला 2779.5 रेटिंगची कमाई करता आली आहे.
डी. गुकेश याने मागील वर्षी बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारतासाठी संस्मरणीय खेळ केला. त्यानंतर गतविजेत्या डिंग लिरेन याला पराभूत करीत विश्वविजेता होण्याचा मान संपादन केला. त्याची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठीही निवड करण्यात आली.
सध्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेतही तो सहभागी झाला आहे. त्याने जर्मनीच्या विनसेंट किमर याच्यावर विजय साकारल्यानंतर भारतासाठीची सर्वोत्तम रेटिंग कमवली हे विशेष. या स्पर्धेतील पाच फेर्यांमध्ये गुकेशला एकाही फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. दोन फेर्यांमध्ये त्याने विजय मिळवला असून, तीन फेर्या ड्रॉ राहिल्या आहेत.
मॅग्नस कार्लसन पहिल्या स्थानी कायमनॉर्वेचा महान खेळाडू मॅग्नस कार्लसन याने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. कार्लसन याने 2832.5 रेटिंगसह पहिले स्थान कायम राखले आहे. डी गुकेशने विश्वविजेता बनून 11 कोटी कमावले, पण त्याच्या हाती नेमके किती आले? अमेरिकेचा ग्रँडमास्टर हिकारु नाकामुरा (2802) दुसर्या, तर अमेरिकेचाच फॅबियानो कारुआना (2798) तिसर्या स्थानावर विराजमान आहे.