| खरोशी | वार्ताहर |
नुकत्याच छत्तीसगड येथे पार पडलेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत जसखार-उरण येथील मैत्रेय गणेश मोकल याला 93 किलो वजनी गटामध्ये तिसरा क्रमांक मिळाला. मैत्रेय याने कांस्यपदकाची कमाई केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. मैत्रेय याला लहानपणापासून पॉवरलिफ्टिंगची आवड असल्याने आजवर त्याने विविध ठिकाणच्या स्पर्धेत कांस्य, रौप्य, सुवर्णपदक मिळवून आपल्या नावलौकिक केला आहे. या अगोदर जळगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. या यशानंतर 16 जानेवारीला छत्तीसगड येथे पार पडलेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेसाठी मैत्रेय याची निवड करण्यात आली होती. यावेळी त्याने कांस्यपदकाची कमाई केली आहे. त्याने सिनिअर 93 किलो वजनी गटात सहभाग घेऊन 610 किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले आहे.