एसटीची दुचाकीला धडक
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील एसटी आगारासमोर गुरुवारी (दि.27) सकाळी पावणेबाराच्या सुमारास एसटीची दुचाकीला धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. जयदीप बना (रा. वरसोली कोळीवाडा) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे.

घडलेल्या अपघातामुळे एसटी आगरासमोर गर्दी झाली असून वातावरण तणावपूर्ण आहे. या अपघातात नेमकी चुकी कोणाची हे अद्याप समजलेले नाही.