| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने वार करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी सौरव उर्फ गौरव म्हात्रे, गणपत, आयान शेख आणि त्याचा मित्र यांच्याविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावेश म्हात्रे हा धाकटा खांदा येथे राहत असून, तो रिक्षा चालवतो. मंगळवारी (दि.13) रोजी गावातील आयान शेख हा दारूच्या नशेत शिवीगाळ करत गोंधळ घालत होता. यावेळी त्याला शांतता राखण्यास सांगितले असता त्याने शिवीगाळ केली. याबाबत त्याच्या घरी सांगितल्यानंतर भावेश त्याच्या घरी निघून गेला. रात्री अकरा वाजता भावेश मत्स्य शेती करत असलेल्या तळ्याजवळील गोठ्यात बैलांना वैरण घालण्यासाठी गेला. यावेळी आयान शेख याचा मित्र सौरव उर्फ गौरव म्हात्रे व गणपत, एका मित्रासह गोठयाजवळ आले आणि शिवीगाळ केली. यावेळी आयानच्या घरी तक्रार का केली तसे बोलून सौरव याने कोयत्याने भावेशाच्या तोंडावर वार केला आणि लाथाबुकयाने मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच अनोळखी इसमाने देखील कोयत्याने वार केले.