| पनवेल | वार्ताहर |
नेरे शंकर मंदिराजवळ दुचाकीच्या झालेल्या अपघातात कोप्रोली, रॉयल पाम्स रेसिडेन्सी येथे राहणार्या मितेश मललेश दवणे (34) या तरुणाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
ऍक्टिव्हा स्कुटीवरील मितेश दवणे हा पनवेल माथेरान रोड ने मालडुंगे बाजूकडे जात होता. नेरे शंकर मंदिराजवळचा रस्ता वळणावळणाचा व लहान असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी नेरे येथील शंकर मंदिराजवळील शेतात सात ते आठ फूट खाली जाऊन कोसळली. यात मितेश हा गंभीर जखमी झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.