शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका
| कोलाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याला पावसामुळे रोहा तालुक्यातील गोवे गावाच्या बाजूनी जाणाऱ्या महिसदरा नदीला पूर आले आणि पुराचे पाणी शेतात शिरले. या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेल्या 25 पोती कांदयाच्या वाहून गेल्याने येथील शेतकऱ्याचे 23 रुपयाचे मोठे नुकसान झाले असुन याचा त्वरित पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे.
गोवे येथील शेतकरी अंकुश बापूराव म्हानवर हे गेली तीन-चार वर्षांपासून अडीच एकर शेतीमध्ये कांद्याचे पीक घेत आहेत. उत्तम आलेल्या कांद्याच्या पिकाला मोठी मागणी असते म्हणून हा कांदा सुकवून चांगला भाव मिळेल म्हणून शेतात ठेवण्यात आला; परंतु निसर्गाच्या कोपामुळे तुफान पडलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्यात हा कांदा वाहून गेल्याने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.
महिसदरा नदीला अनेक ठिकाणी खांडी गेल्या आहेत.यामुळे नदी दुथडी भरून वाहु लागली तर या खांडीतून दरवर्षी भातशेती पाणी घुसून भात शेतीचे मोठे नुकसान होते याविषयी कोलाड पाटबंधारे खाते यांना वेळोवेळी अर्ज दिल्यानंतर. थातूरमातुर कामे केली गेली. परंतु अनेक ठिकाणी अद्याप ही नदीला खांडी गेलेल्या आहेत.यामुळे पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांची सुटका झाली नाही. परिणामी येथील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
मालाची किंमत चांगली येते या हेतूने माल शेतात साठवून ठेवण्यात आला. परंतु, साठवून ठेवलेला माल निसर्गाच्या कोपामुळे क्षणात वाहून गेल्याने नुकसान भरपाई मिळावी.
अंकुश म्हानवर,
नुकसानग्रस्त शेतकरी