| रसायनी | राकेश खराडे |
खालापूर तालुक्यातील मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक गावातील तीन घर परीसरात ऑटो टेक पार्क आहे, येथे टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर गाड्यांची सर्व्हिस केली जाते, येथे गाड्यांना लागणारी सर्व पार्ट मिळतात, त्याचप्रमाणे गाड्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते. शनिवारी( दि.16) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, खोपोली नगर पालिका व रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या अग्निशमन दलाचे बंब वेळेवर आल्याने शर्तीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आण्यात आली आहे. चौकचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनिष मोरे, अग्निशमन दलाचे संजय कुले यांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनिष मोरे हे विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.