| मुंबई | प्रतिनिधी |
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात वज्रमूठ उगारलीय. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळाची (दि.15) पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे , राज ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील (शेकाप), बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, रईस शेख, अनिल परब, अनिल देसाई, अजित नवले उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं?
मनसेप्रमुख राज ठाकरे
1. निवडणुका लढवतं राजकीय पक्ष, राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही
2. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी ?
3. सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका
4. आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच
5. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही
6. राजकीय पक्षांना क्लिअर झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका
7. निवडणूक कार्यक्रम रद्द करा
8. बाळासाहेब थोरात ८ टर्म ८०-९० हजार मतांनी निवडणूक जिंकतात, यंदा लाखाने पडले, हे कसे शक्य
9. याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करू मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा, आम्ही तयार नाही ते
10. निवडणूक पुढे ढकला
11. निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याशिवाय काय काम
उद्धव ठाकरे
1. सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा.
2. VVPAT तुम्ही घेत नाही, म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल
3. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात
1. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. त्याबाबतही अनेक तक्रारी
2. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झाले नाही
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील काय म्हणाले?
1. तेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीर मतदार आहे. त्याचा कोणता ठावठिकाणा नाही
2. EPIC क्र. वेगवेगळा असायला पाहिजे. बरेच मतदार असे की ज्यांना एकच EPIC क्र.
3. आम्ही अर्ज केला, जाब विचारलं तर आयोग उत्तर देत नाही
4. जयंत पाटील यांनी सर्व पुरावे निवडणूक आयोगासमोर ठेवले.
3. जयंतराव पाटील यांनी यादी समोर ठेवताच निवडणूक आयोग तपासतो म्हणाले.
4. नालासोपारा येथील नाव सुषमा यादव ही खोटी मतदार… आम्ही तिथे गेलो शहानिशा केली. लगेच संध्याकाळी हे नाव काढले
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
1. तुमची यंत्रणा सज्ज नाही
2. दुबार मतदार आहेत
3. एका पक्षाला पाहिजे तशी वॉर्ड रचना झाली
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार काय म्हणाले
1. देवांग दवे कोण आहे, याची माहिती घ्या
2. हा माणूस भाजपचा आहे, हा निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो
3. यादीत खुप घोळ तर मग ही निवडणूक पारदर्शक कशी ?
निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ काय भेटतंय?
1. निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ करण्यासाठी चर्चा
2. लोकशाही बळकट करण्यावर चर्चा
3. स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका पारदर्शी व्हाव्या अशी मागणी
4. महाराष्ट्रातील मतदारयाद्यांचा घोळ दूर करावा अशी मागणी







