विविध उपक्रमांनी शिवाजी महाराजांना मानवंदना
। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त शिवप्रेमींनी अभिवादन केले. रायगड जिल्ह्यातील विविध गड, किल्ल्यांसह सर्वत्र सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप, यानुसार शिवप्रेमींमध्येे उत्साह संचारला होता. अनके ठिकाणी रक्तदानासारखे सामाजिक उपक्रमसुद्धा शिवजयंतीनिमित्त घेण्यात आले. यावेळी मिरवणुका, शिवरायांच्या पुतळ्यांचेही पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने अलिबाग मधील अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना नगरसेवक तसेच अलिबाग शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी शिवभक्त सहभागी झाले होते.