| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पीएनपी कला विकास मंडळ अलिबाग अंतर्गत साहित्य प्रभा या साहित्य मंडळामार्फत अलिबागमध्ये काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबागमधील पीएनपी मध्यवर्ती कार्यालय येथे दि.10 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता काव्य महोत्सव होणार आहे. या महोत्सवासाठी नवोदित, अनुभवी कवींना ‘आठवणीतील माझी शाळा’, ‘हरवलेलं बालपण’ आणि ‘माती’ यापैकी एका विषयावर कविता सादर करता येणार आहे. आपल्या आठवणी, अनुभव आणि भावना शब्दरूपा मांडण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.कविता जगली पाहिजे, कवितेची गोडी प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे यासाठी काव्यप्रेमींनी या महोत्सवात सहभाग घ्यावा. इच्छुक कवींनी आपली कविता साहित्य मंडळाकडे दि.5 मेपर्यंत आगाऊ पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हा काव्य महोत्सव नवीन व अनुभवी कविंसाठी नवीन झळाळी देणारा ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.







