एकजण ठार
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पोजे गावानजीक टँकरचा अपघात झाला असून. यात घटनास्थळी एकाचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टँकर अपघातानंतर बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि सदर अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात आला.
अपघातात टँकरखाली एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला, ज्यास उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पनवेल येथे नेण्यात आले. प्रथमदर्शनी तो दगावला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरीही त्यास अद्याप मृत घोषित करण्यात आलेले नाही. तसेच त्याचे नाव देखील समजले नसून वाहतूक पोलिस त्याच्याशी संबंधित कागदपत्रे मिळतात का याचा तपास करत आहेत.