पोलिसांचा तक्रार करताच दंडात्मक कारवाई
। खोपोली । प्रतिनिधी ।
बाजारपेठ समाज मंदीर रस्त्यावर मोटारसायकलवरून जाणार्या तरूण थुंकला. बाजूने चालणार्या महिला दक्षता समितीच्या सदस्या शिल्पा मोदी यांच्या अंगावर थुंकी उडाली. तरूणाला विचारणा केली असता अरेरावीने त्याने प्रतिप्रश्न करत मी तुमच्या अंगावर तर नाही ना थुंकलो असे उध्दटपणे बोलल्याने मोदी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करताच कर्जतवरून तरूणाला बोलावून दंडात्मक कारवाई केली आहे.
बाजारपेठ समाजमंदीर रस्त्यावरील नजराना फोटो स्टुडियो समोरून महिला दक्षता समितीच्या सदस्या शिल्पा मोदी चालत जात असतानाच बाजूने मोटारसायकलवरून तरूण थुंकला, थुंकी मोदी यांच्या अंगावर उडाली असती म्हणून त्यांनी तरूणाला रस्त्यावर थुंकणे हा कायद्याने गुन्हा आहे अशी समज देण्याचा प्रयत्न केला.शिल्पा मोदी यांनी घटनेचे माहिती पोलीस ठाण्यात देत मोटारसायकलचा अर्धवट नंबर दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करून तरूणाला खोपोली पोलिस ठाण्यात बोलावून समज देत खालापूर कोर्टात दंडात्मक कारवाई केली आहे.
दुर्देवाची बाब अशी की रस्त्यावर थुंकणे हे जरी आपल्याला किळसवाणे वाटले तरी आपण त्यावर जाब विचारायला घाबरतो आणि जाऊ दे आपल्याला काय त्याचं? असा विचार करून निघून जातो. पण आपला परिसर, आपले शहर पर्यायाने आपला देश स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच नाही का? जर कोणी कायद्याचे उल्लंघन करत असेल, तर त्याला समजावून देण्याची जबाबदारी आपली आहे. छोट्या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरिक्षक शीतल राऊत यांनी कारवाई केल्याबद्दल कौतुक.
– शिल्पा मोदी, सदस्या – महिला दक्षता समिती,
खोपोली पोलीस ठाणे