। चिपळूण । प्रतिनिधी ।
आयवायसीएलने नुकत्याच आपल्या लीगमधील महाराष्ट्र संघाची घोषणा केली. त्यामध्ये चिपळूण पोफळी सय्यदवाडीमधील अरमान अन्सारी याची निवड करण्यात आली. यंदा मुंबई येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीत महाराष्ट्राकडून एकूण 473 खेळाडूंनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये अरमान अन्सारे याने अंतिम 11 खेळाडूंत स्थान मिळवले. तो 5 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. दिल्ली येथील सुलतान जीमखान्याचे प्रशिक्षक सुलतान साजिद यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन झाले. त्याने निवड चाचणीत घेतल्या गेलेल्या सामन्यात एकूण 228 धावा केल्या. त्याआधारे त्याची आयवायसीएलच्या महाराष्ट्र ग्लाडीएटर्स संघाकडून निवड करण्यात आली. आयवायसीएलच्या नॅशनल चॅम्पियनशिप विजेत्या खेळाडूंना पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका संघासोबत इंटरनॅशनल ट्रॉफी खेळण्यासाठी दुबईला आमंत्रित केले जाईल.