। जालना । प्रतिनिधी ।
जालना जिल्ह्यातील परतूरच्या महिला तहसीलदारावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. प्रतिभा गोरे असे महिला तहसीलदाराचे नाव असून त्यांच्या फिर्यादीवरुन वाळू माफियांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दुधना नदी पात्रात अवैध वाळूचे उत्खनन करणाऱ्यावर गुरुवारी (दि. 06) मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी, स्वतः तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी परतुर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून अखिल बिल्डर, इलियास कुरेशी, अमजत कुरेशी, इरफान शेख, जुनेद व इतर 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.