सारळ | वार्ताहर |
भारतीय पत्रकार संघाच्या अलिबाग शाखेकडून बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शासनाचे नियम पाळत उसताहपूर्ण वातावरणात अलिबाग येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयपाल पाटील होते.
या कार्यक्रमास पाहुणे म्हणून राजेंद्र कासार अध्यक्ष निवृत्त पोलीस संघटना -अलिबाग, पत्रकार राजीव नेवासेकर, महेंद्र खैरे, चित्रकार सुनील प्रधान, संगीतकार विकास रणपिसे, सुहास म्हात्रे, पूजा पडणेकर, ऋद्धि केळसकर यांची उपस्थिती होती.