| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
दारूसाठी पैसे न दिल्याने हाताबुक्याने मारहाण करून चेहऱ्यावर ब्लेडने वार करण्यात आले. या प्रकरणी चार अनोळखी इसमांन विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असिफ शेख हा नवनाथ नगर झोपडपट्टी, पनवेल येथे राहत असून तो घरून रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाण्यासाठी निघाला. यावेळी तीन ते चार इसमांनी त्याच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. त्याने नकार दिला असता त्यांच्यात वाद झाला आणि तो रेल्वे स्टेशन कडे जाण्यासाठी निघाला. साई मंदिर जवळ आले असता ते चारही ईसम पाठीमागून आले आणि त्याला मारहाण केली. एका इसमाने हातातील ब्लेडने नाकावर व चेहऱ्यावर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला.