। तळा । वार्ताहर ।
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रहाटाड गावाला भाजप व शिंदेगटाकडून सुरुंग लावण्यात आला असून तळा तालुक्यातील एकमेव रहाटाड ग्रामपंचायतींवर भाजप व शिंदेगटाची सत्ता स्थापन झाली आहे.
राष्ट्रवादीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सोनल सचिन भाटे यांचा भाजप शिंदेगट युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार मिताली मंगेश करंजे यांनी 71 मतांनी पराभव केला आहे. यांसह माजी सरपंच चांगदेव पाटील, नियती नैमेश नागे, रुक्मिणी मालुसरे,मंगल कंबु,सज्जाद शफी चोगले हे विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादीचे केशव झिंगे,पदूबाई खुटीकर,हेमलता मूर्तूगे,गीता बालबा व विठोबा कंबु हे उमेदवार पराभूत झाले आहेत. एकूण नऊ संख्या असलेल्या रहाटाड ग्रामपंचायतींवर भाजप व शिंदेगट युतीचे सहा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनविरोध तीन सदस्य निवडुन आले आहेत.