पोलीय बंदोबस्तात पालिकेकडून पुन्हा ऑडिट
। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील काजळपुरा परिसरातील तारिक गार्डन ही इमारत ऑगस्ट 2020 मध्ये कोसळल्या नंतर महाड नगरपालिकका प्रशासन चांगलेच खडबडून जागे झाले. त्यानंतर शहरांतील बहूतांशी जीर्ण झालेल्या तसेच जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. अश्याच प्रकारे अमिना बिल्डींगचे ऑडिट देखिल करण्योत आले होते. त्यासाठी इमारती मधील रहिवाशांना नोटीस देखिल बजावण्यात आली होती. बिल्डींगचे दोन एजन्सी मार्फत अमिना इमारतीचे ऑडिट करण्यात आल्यानंतर प्रत्येक एजन्सीचा अहवालामध्ये मात्र फरक असल्याचे दिसुन आल्याने स्ट्रक्चर बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
महाड शहरोत असलेली अमिना इमारत जीर्ण झाल्याने रहाण्यास धोकादायक असल्याचा निष्कर्ष पालिकेच्या बांधकाम विभागाकडून काढण्यात आला होता. पालिकेने या इमारतीचे स्ट्रक्चरला ऑडिट तातडीने करण्याचे आदेश दिले. त्या प्रमाणे दोन एजन्सी कडून ऑडिट करण्यात आल्यानंतर दोन्ही एजन्सीनी दिलेल्या अहवालामध्ये फरक असल्याचे दिसुन आले. हा फरक कशामुळे आला याबाबत चौकशी करण्यात आल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये पुन्हा इमारतीचे ऑडिट करण्यासाठी इमारतीच्या बांधकामाचे नमुने गोळा करण्यात आले.
या इमारतीचे बांधकाम सन 2007-08 मध्ये करण्यात आले होते. एवढ्या अल्पावधी मध्ये इमारतीची दुरवस्था झालेली दिसुन येते असताना अद्याप या इमारतीमध्ये सहा कुटूंबे राहत असल्याचे कांबळे यांनी सांगितले. आता अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.