| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील दामत या मुस्लिमबहुल गावात गोहत्या होत असल्याच्या तक्रारी येत असतात. काही दिवसांपूर्वी काही गोरक्षक मुस्लिम लोकवस्तीच्या दामत गावात गेले असता पोलिसांसमोर हिंदू तरुणांना शिवीगाळ आणि धमकी देणारे प्रकार घडल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आणि दोन्ही समाजात निर्माण झालेले तेढ कमी करण्याचे प्रयत्न केले. त्या सर्व प्रयत्नांना यश आले असून, पोलिसांच्या भूमिकेमुळे नेरळजवळील दामत गावातील मुस्लिम समाजातील पुढार्यांनी आपल्या गावातील गोहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन नेरळ पोलिसांना दिले आहे. मुस्लिम धर्मीय समाजातील तरुणांनी गोहत्या रोखण्यासाठी घेतलेली सामंजस्याची भूमिका याचे कौतुक पोलीस उपअधीक्षक यांच्याकडून केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नेरळ परिसरामध्ये हिंदू मुस्लिम या दोन धर्मामध्ये तणावाचे वातावरण आहे. दामतमध्ये गोहत्या होत असल्याचा आरोप – व्हिडिओ- सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे काही दिवसापासून नेरल परिसरामध्ये वातावरण पाहायला मिळाले. या पार्शवभूमीवर जिल्हा पोलिस उप अधीक्षक डी डी टेले यांनी दामत गावात तेथील मुस्लिम धर्मीय लोकांची बैठक घेतली.गोहत्या बंदीचा कायदा असल्याने खुलेआम होत असलेली कत्तल रोखणे हे सर्वंचे कर्तव्य असल्याने मुस्लिम समाजाने देशाचे कायदे समजून घेतले पाहिजेत असे सूचित केले.त्यानंतर पोलिसांनी काही हिंदू धर्मीय नेत्यांशी चर्चा केली आणि व्हायरल व्हिडीओ वरून निर्माण झालेले वादळ शमविण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आज 13 मे रोजी पुन्हा दामत गावातील ग्रामस्थ यांच्या सोबत पोलीस उप अधीक्षक यांनी बैठक घेतली. त्यावेळी दामत गावातीलअजी सरपंच असगर खोत,तसेच सर्फराज टिवाले, मुजहिद खोत, जकी नजे यांच्यासह अनेक मान्यवर मुस्लिम धर्मीय यांच्यासोबत चर्चा केली. यापुढे अशी कोणतीही घटना घडली तर आम्ही पहिले सर्वजण मिळून संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले जाईल असे स्पष्ट केले.
अकरा तारखेला पहाटे पाचच्या सुमारास जो काय इन्सिलेंट झाला होता त्या संदर्भात आज दामत गावातील रहिवासी यांनी ठराव करून गावामध्ये अशी कोणतीही घटना घडणार नाही त्या संदर्भात त्यांनी एक कमिटी तयार केली आहे त्याची माहिती आज आम्हाला पोलीस स्टेशन येथे येऊन दिली आहे तसेच दामाद गावामध्ये जे गायी आहेत बैल आहेत त्यांना आम्ही टॅगिंग करण्यासाठी पत्र देणार आहोत.
डी.डी.टेळे,
पोलीस उपनिरीक्षक, कर्जत