| कर्जत | वार्ताहर |
श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री दत्तजयंतीनिमित्त पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पहाटे काकडआरती, महाअभिषेक, श्रीदत्तयाग, महाआरती, महाप्रसाद तसेच अंतर्नाद प्रस्तुत गुरू एक जगी त्राता हा शाल्मली कांबळे यांनी भावभक्ती गीतांचा कार्यक्रम सादर केला. त्यांना सुयोग ओक, तबला चैतन्य भागवत, पखवाज विशाल निगुडकर, योगेश देशमुख यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन अर्चना अडावदकर यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान शाल्मली कांबळे व अर्चना अडावदकर यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी विक्रांत दरेकर, राजू पोतदार, राजेंद्र निगुडकर, दिनेश अडावदकर, प्रदीप सुर्वे, अभि दरेकर, सौरभ देशमुख, अशोक शितोळे, दिपक कुलकर्णी, भानूकाका शिंदे, सदानंद लोखंडे, दादू दरेकर, नरेंद्र दरेकर, महेंद्र निगुडकर, दिलीप पांडे, वत्सला वांजळे, संजय मालगुंडकर ग्रामस्थ तसेच हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.