| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील सहयोगी अपंग कल्याणकारी संस्थेच्या वतीने विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीच्या उद्देशाने शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. याप्रसंगी दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी. पाटील यांच्यासमवेत पेण येथील पतसंस्थेचे राजू वाघमारे, बस संस्थेचे उपाध्यक्ष गणेश महामुणकर, भारतीय जैन संघटनेचे मोतीशेठ जैन, माजी नगरसेवक महेंद्र गुजर, अध्यक्ष पप्पू सोलंकी, उपाध्यक्ष सुनील कोठारी, सागर कोठारी, विजया कोठारी, समाज क्रांती संघटनेचे प्रल्हाद घेवदे, जिल्हा सचिव किशोर पाटील,अलिबाग तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, पत्रकार नंदकुमार मरवडे, आदी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन संतोष करडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अध्यक्ष राजेश कांबळे, सेक्रेटरी रमेश खराडे यांनी मानले.