| रत्नागिरी | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे आज शुक्रवार (दि.21) रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, बावनदी स्टॉप नजिक आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. ट्रक उतारावर होता. दरम्यान चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. हा ट्रक लोखंडी सळ्यांनी पूर्णपणे भरलेला होता. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला व सर्व सामान या केबिनवर पडले होते. केबिनमध्ये असलेल्या चालकासह त्याचा सहकारी महंमद रजब अली (21) राहणार प्रतापगड याच्या अंगावर पाईप पडल्याने या अपघातात त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलीस व ग्रामस्थांनी हे मृतदेह बाहेर काढले. पोलीस या अपघाताचा तपास करीत आहेत.