डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन पहिल्या क्रमांकावर
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. तर, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. द इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने हे सर्वेक्षण केलं होतं. जगभरातल्या 60 शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. सुरक्षित शहरं निवडण्यासाठी 76 निकषांची पुर्तता करण्याची अट होती. यामध्ये डिजीटल, हेल्थ, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि संबंधित शहरात माणूस वैयक्तिकरित्या किती सुरक्षित आहे, या सर्व गोष्टींचा समावेश होता.
भारताची राजधानी दिल्लीसह मुंबईचे या यादीत नाव आहे. यामध्ये दिल्ली 60 पैकी 48व्या क्रमांकावर तर मुंबई 50व्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि मुंबईच्या मध्ये जोहान्सबर्ग आणि रियाध ही दोन शहरं आहेत. मुंबई दिल्लीपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं तरीही वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत दिल्ली 52.8 पॉइंट्ससह 41व्या क्रमांकावर आहे. तर मुंबई 48.2 पॉइंट्ससह 50व्या क्रमांकावर आहे.
डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन 100 पैकी 82.4 पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. कोपेनहेगनने टोक्यो आणि सिंगापूरसारख्या शहरांना मागे टाकत सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसर्या क्रमांकावर कॅनडाची राजधानी टोरंटो आहे. टोरंटोला 82.2 पॉइंट्स मिळाले आहेत.
टोरंटो हे वैविध्यपूर्ण शहर असून इथली जवळपास 30 लाख लोक 180 भाषा बोलतात. उन्हाळा आवडणार्यांसाठी तर टोरंटो नंदनवन आहे. तिसर्या क्रमांकावर सिंगापूर शहर आहे. शहराची दुसर्या क्रमांवरून तिसर्या क्रमांकावर घसरण झाली आहे. करोनाचा सिंगापूर शहराला मोठा फटका बसला असला तरी हे शहर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलंय. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी आहे. सिडनीला 80.1 पॉइंट्स मिळाले आहेत. सिडनी हे जगातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक असून खाद्यप्रेमींसाठी पर्वणी आहे. तर पाचव्या क्रमांकावर जपानची राजधानी टोक्यो शहर आहे.