| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील पाटणूस येथील गोपीनाथ रामा वाघमारे यांच्या वडिलोपार्जित मिळकतीमधील संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदला संबंधित अधिकार्यांनी संगनमत करून अन्य व्यक्तीस अदा केल्याच्या या गैरव्यवहाराची चौकशी होऊन संबंधित अधिकार्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी राज्याचे आदिवासी विकासमंत्री के.सी.पाढवी यांच्याकडे मुंबई येथे नुकतेच निवेदन देऊन आ.भरत गोगावले यांनी केली आहे. यावेळी निजामपूरचे शिवसेनेचे कार्यकर्ते सुधीर पवार, गोपीनाथ वाघमारे,कोंडू फाळके उपस्थित होते. यावेळी आ. गोगावले यांनी निवेदनाची प्रत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही देऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे.