। महाड । प्रतिनिधी ।
महाडचे आ. गोगावले यांनी 15 वर्षांपासून विकासाच्या नावाखाली मारलेल्या थापांना कंटाळून महाड तालुक्यातील कुसगाव, खरबाचा कोंड येथील ग्रामस्थांनी हनुमंत जगताप यांच्या उपस्थितीत शिंदे गटातून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी महाड विधानसभा मतदार संघात परिवर्तन होणार असल्याचे चित्र असून आ. गोगावले यांची हुकूमशाही व दमदाटी मोडीत काढत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष प्रवेशांमुळे उमेदवार स्नेहल जगताप यांच्या विजयाचे मताधिक्य वाढत आहे. यावेळी स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवत आरुण देवळेकर, शैलेश पवार, प्रविण आंग्रे, अतिश गुडेकर, श्रीकृष्ण चव्हाण, संदेश शिगवण, तुळशिराम शिगवण, अजय देवळेकर, धोडू लुष्टे, रामचंद्र चव्हाण, गंगाराम चव्हाण, समिर कोशिळकर, रमेश बांद्र, प्रसाद बांद्रे, रामदास देवळेकर, उमेश शिगवण, नितेश शिगवण, लक्ष्मण चव्हाण, महादेव देवळेकर, सुरेश देवळेकर, यशवंत शिगवण, राज झाजे, दाऊद कोंडीवकर आदींनी शिवसेना नेते हनुमंत जगताप व दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, महाड तालुका संघटक राजुशेठ कोरपे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.