| रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग व जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.19) सकाळी 11 वाजता बालगंर्धव रंगभवन, रिलायन्स पेट्रोकेमिकल टाऊनशिप, नागोठणे, ता. रोहा येथे ‘विधी सेवा शिबीर व शासकीय सेवा योजनांचा महामेळावा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या योजनांची माहिती एकाच छताखाली सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोल शिंदे यांनी दिली आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग ए.एस. राजंदेकर यांनी केले आहे.