| रायगड | खास प्रतिनिधी |
महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल यांच्या मार्गदर्शनाखाली डाक विभागाच्यावतीने दि. 22 ते 25 जानेवारी या कालावधीत मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे महापेक्स 2025 हे राज्यस्तरीय तिकीट प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पोस्ट विभागाच्यावतीने रायगड एक्स्प्रेस या नावाने संभाजीनगर ते मुंबई अशी ई-बायसिकल रॅली काढण्यात आली आहे. रॅलीची सुरुवात 14 जानेवारी रोजी संभाजीनगर येथून झाली आहे. या रॅलीचे आगमन रायगड डाक विभागात दि. 19 जानेवारी रोजी महाड येथे होणार आहे.
20 जानेवारी रोजी चवदार तळे, रायगड किल्ला, नंतर 21 जानेवारी रोजी बल्लाळेश्वर (पाली) येथून वरद विनायक महड असा या रॅलीच्या प्रवासाचा मार्ग राहणार आहे. रायगड डाक विभागाचे डाक अधीक्षक सुनील थळकर यांनी याबाबत बोलताना या रॅलीच्या निमित्ताने डाक विभागाच्या कर्मचारीवर्गाकडून डाक सेवा आणि तिकीट प्रदर्शन याबाबत जनजागृती करणे, सायकल रॅलीद्वारे फिट इंडिया संदेशाचा प्रचार करणे, स्थानिक, विद्यार्थी, स्वयसेवी संस्थाशी संवाद साधणे, स्वच्छता ही ईश्वर सेवा, डाक सेवा जनसेवा या संदेशाचा प्रचार करणे हा उद्देश साध्य केला जणार आहे, अशी माहिती दिली.