| म्हसळा | वार्ताहर |
‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या पक्षाच्या नवीन निशाणी ‘मशाल’ चिन्हाचे पूजन गुरुवारी म्हसळा येथे तमाम उद्धव सेनेच्या शिवसैनिकांनी करून सन्मानाने शहरातून मशाल मिरवणूक काढण्यात आली.
या प्रसंगी तालुकाप्रमुख सुरेश कुडेकर, माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, नगरसेविका राखी करंबे, गटनेते मुन्ना पानसरे, उपशहर प्रमुख दीपल शिर्के, अभय कलमकर, प्रसन्न निजामपूरकर, बाळा मेंदाडकर, राजाराम तिलटकर, संतोष सुर्वे, भाई कांबळे, अनंत नाक्ती, हेमंत नाक्ती, पांडुरंग सुतार, राहुल जैन, विशाल साईकर, अमित महामूनकर, महिला विभाग संघटिका दिपाली कांबळे, नैनिता भुवड, जयश्री जाधव, कमल खंडाळकर, प्रिया जाधव, प्रविता पोटले, निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी सांगितले कि, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना दिलेला आदेश हा शिरसावंदय मानून नवीन निशाणी मशाल हि तळागाळातील शिवसैनिकांपर्यात पोचविण्याची आमची जबाबदारी असून ती आम्ही समर्थपणे पार पाडू असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.