| अलिबाग | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनची विशेष सभा रविवार 10 सप्टेंबर रोजी कल्याण येथील शिक्षक भवनात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी कोकण विभागाचे उपाध्यक्ष हिराजी पाटील होते तर प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य संघटनेचे महासमादेशक पीतांबर महाजन, उप महासमादेशक अनिल शेजाळे, कोकण विभागीय समादेशक व राज्याचे कायदेशीर सल्लागार डॉ.अॅड.के.डी.पाटील, श्याम फाळके, दिपक पोहरे, एम.एस.क्षिरसागर, डॉ.श्रीकांत पाटील, दिलीप स्वामी, डॉ.मणिलाल शिंपी, तुफेल दामाद, संजय डोंगरे, लियाकत धनसे, अनंत किनगे, शिनलकर, विजयकुमार बोटूके, श्री. अहिरे आणि रायगड, ठाणे, मुंबई, कल्याण, बुलढाणा, नागपूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा अनेक जिल्ह्यांतून आर.एस.पी.अधिकारी उपस्थित होते. यासभेत हिराजी पाटील, अॅड.के.डी.पाटील, क्षिरसागर व डॉ.श्रीकांत पाटील यांना नेमणूक पत्र देण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन अनंत किनगे यांनी केले.