| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
‘एक देश, एक निवडणूक’ धोरणाच्या हालचालींना आता वेग आला आहे. कारण यासाठी नेमलेल्या समितीची पहिली बैठक निश्चित झाली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक देश, एक निवडणूक’ या धोरणाच्या पडताळणीसाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक 23 सप्टेंबर 2023 रोजी पार पडणार आहे, अशी माहिती स्वतः कोविंद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
समिती ‘वन नेशन, वन इलेक्शन’ अर्थात देशभरातील सर्व निवडणुका जसं लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, महापालिका, पंचायत समिती आदी निवडणुका एकाच वेळी घेता येणं शक्य आहे का? याचा अभ्यास आणि पडताळणी करणार आहे. यासाठी ही समिती देशातील सर्व राज्यांचा दौरा करुन याबाबत लोकजागृती तसेच लोकांचं म्हणणं ऐकून घेतील. तसेच विविध राजकीय पक्षांशी देखील ही समिती सल्लामसलत करणार आहे.