| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिरनेर येथील प्रख्यात नृत्यांगणा आर्या मंगेश नारंगीकर हिच्या जन्मदिनानिमित्ताने श्रीराम सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि महागणपती 40 प्लस मास्टर चिरनेर यांच्यावतीने (दि.2) जून रोजी चिरनेर येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात असणार्या रंगमंचावर, रात्री आठ वाजता, राज्यस्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात 13 वर्षाखालील लहान गटातील नृत्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 150 रुपये प्रवेश फी आकारण्यात आली आहे. तर, 14 वर्षावरील मोठ्या गटातील नृत्य स्पर्धेची फी चारशे रुपये ठेवण्यात आली आहे. लहान गटात नृत्य स्पर्धेत प्रथम येणार्या विजेत्या स्पर्धकाला 3000 रुपये व आकर्षक ट्रॉफी देण्यात येईल. द्वितीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांकासाठी एक हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. तर, 14 वर्षावरील नृत्य स्पर्धेच्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक सात हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक पाच हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांक तीन हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी अशी पारितोषिके विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रणय तांबे (7666752275) संकेत जयस्वाल (7021724560) पप्पू सूर्यराव (9821625362) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेच्या पूर्वतयारीची लगबग जोरदारपणे सुरू असून, श्रीराम सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि महागणपती 40 प्लस मास्टर चिरनेरचे कार्यकर्ते तयारीच्या दृष्टीने विशेष परिश्रम घेत आहेत.