। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा येथील ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचलित प्रेरणा मतिमंद मुलांच्या शाळेची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली .प्रेरणा मतिमंद मुलांच्या शाळेची 26 सप्टेंबर रोजी झालेल्या सभेत अध्यक्षपदी दर्शना आठवले, उपाध्यक्ष संजय आर्ते,सचिव अशोक जोशी,सहसचिव राजश्री आठवले, खजिनदार रामनरेश कुशवाहा,सहखजिनदार निवास वडके, सदस्य श्रिया जोशी याची बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी अध्यक्षांनी शाळे विषयी माहिती देताना सांगितले आपली आपली शाळा ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था ही एक शासनमान्य स्वयंसेवी संस्था आहे मुलांच्या क्षेत्रात 2 ऑक्टोबर 2006पासून 15वर्षे अविरतपणे सुरू आहे या शाळेत 35 विद्यार्थी विशेष सेवांचा लाभ घेत आहेत ते पुढे संस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती देताना म्हणाले संस्थेच्या स्वतःच्या मालकीची जागा व सुसज्ज इमारत, संस्थे साठी वाहनं व्यवस्था, वस्तीगृहा, व्यवसायिक प्रशिक्षण केंद्र, शिक्षक प्रशिक्षण केंद्र,ग्रंथालय,संशोधन केंद्र आदी योजना आहेत.