| पुणे | प्रतिनिधी |
सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराने मनोरुग्ण महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून आरोपी कामगाराला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी 34 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय पीडित महिला मनोरुग्ण आहे. आरोपी तरुणाला सुश्रृषेसाठी ठेवण्यात आले होते. मनोरुग्ण महिलेला धमकावून त्याने तिच्यावर बलात्कार केला आहे. 3 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान त्याने महिलेला धमकावून वेळोवेळी बलात्कार केला. महिला मनोरुग्ण असल्यामुळे सुरुवातीला तिने या घटने बद्दल कोणालाही सांगितले नाही. नंतर मात्र तिने माहिती दिली. त्यानंतर आरोपीविरुद्ध तक्रार देण्यात आली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.