| मुंबई | प्रतिनिधी |
नालासोपारा पूर्वेला असलेल्या सनशाइन सर्कल या परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली असून या ठिकाणी त्वरितच अग्निशमन दलाने युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम केले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. परंतु यामध्ये महानगरपालिकेच्या सहा बस झालेल्या आहेत. या ठिकाणी अनेक वर्षांपासून भंगार बस ठेवलेल्या आहेत. पडीक परिस्थितीमध्ये असलेल्या बसमध्ये अनेकदा तरुण अमली पदार्थांचे सेवन करतात. तर याबाबत नागरिकांनी तक्रार केलेली होती. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी अपघात वाढत आहेत.