। आगरदांडा । प्रतिनिधी ।
तरुणांसाठी कौशल्य विकास व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मंगळवारी (दि.25) सकाळी अकरा वाजता मुरूड येथील सार्वजनिक वाचनालयात करण्यात आले आहे. तरुणांकरीता व महिला बचत गटांकरीता ही सुवर्णसंधी असणार आहे. तसेच, याशिबिरात शासकिय कर्ज मिळणेबाबत मार्गदर्शन असणार आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुरुड सार्वजनिक वाचनालयाकडून करण्यात आले आहे. या शिबिरात खादी ग्रामोद्योग रायगड औद्योगिक परिवेक्षक लतिका कवडे, कौशल्य विकास विभाग अधिक्षक अमिता पवार, जिल्हा उद्योग केंद्र मॅनेजर हरलिया यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.