मुरुडच्या हजारो नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग
| मुरुड | प्रतिनिधी |
भारतीय स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शासनाच्या स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अभियान मुरुड जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन आणि भारतीय तटरक्षक दल व विविध संस्था, शाळा, विद्यालये, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, नागरिक यांच्या सहकार्याने समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत 17 डिसेंबर या आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिवसापर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. लोकल कम्युनिटीच्या सहभागातून समुद्राचा शाश्वत विकास करायचा या मूळ उद्देशासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी केंद्र शासनाने आयोजित केलेला होता.
या मोहिमेत कोस्टगार्ड अधिकारी अरुण कुमार सिंग, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार रवींद्र सानप, महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, माजी राष्ट्रपती पुरस्कार विजेते शरद कारभारी, नगरसेवक प्रमोद भायदे, पांडुरंग आरेकर, अविनाश दांडेकर, युगा ठाकूर, अनुजा दांडेकर, भारतीय तटरक्षक दल, तहसील व नगरपरिषद कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि सन्माननीय नागरिक तसेच विविध शाळा, विद्यालये, पतसंस्था, बँका, मुरुड तालुक्यातील मच्छिमार सोसायटी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
रेवदंडा समुद्रकिनार्याची स्वच्छता
| रेवदंडा | वार्ताहर |
रेवदंडा समुद्रकिनारी स्वच्छ व सुरक्षित सागर अभियान राबविण्यात आले. या अभियानात रेवदंडा पोलीस, रेवदंडा व चौल ग्रामपंचायत, रेवदंडा हायस्कूल, रेवदंडा व चौल राजिप शाळा शिक्षक व विद्यार्थीवर्ग, तसेच महसूल विभाग सहभागी झाले होते. सकाळी आठ वाजता रेवदंडा हायस्कुल ते रेवदंडा समुद्रकिनार्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या रॅलीस सुरूवात झाली. या रॅलीला जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे व रेवदंडा हायस्कूल शिक्षकवर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. या रॅलीमध्ये महसूल विभाग, रेवदंडा पोलीस ठाणे कर्मचारी, रेवदंडा हायस्कूल व राजिप शाळांचे शिक्षकसुॠा सहभागी झाले होते.

या रॅलीत उपनिरीक्षक शिवकुमार नंदगावे, सार्वजनिक बांधकाम विभाग राजीव डोंगरे, रेवदंडा उपसरपंच मंदा बळी, सदस्य संदिप खोत, सुवर्णा चेरकर, प्रियाबळी व ग्रामविकास अधिकारी प्रदिप दिवकर, कर्मचारी सुभाष मानकर, सचिन मयेकर, देवकर, चौल ग्रा.पं. कर्मचारी, चौल मंडळ अधिकारी पी.आर. म्हात्रे, तलाठी रेवदंडा संजय शित्रे, चौल उत्तर तलाठी सरफराज दफेदार, दक्षिण चौल तलाठी शीतल म्हात्रे, खानाव तलाठी आरती म्हात्रे, बामणगाव तलाठी किरण डबेलोस्कर, मल्याण तलाठी भोपाली नाईक व चौल मंडळातील सर्व कोतवाल तसेच रेवदंडा पोलिस पाटील स्वप्निल तांबडकर सहभागी झाले होते.
काशिद समुद्रकिनारा स्वच्छ
|कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तहसील व काशिद ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन काशिद समुद्रकिनारा चकाचक करण्यात आला.

या स्वच्छता मोहिमेत मुरुड महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष वाणी, गटशिक्षणाधिकारी बी.के. पाखरे, महेश भगत, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका प्रियंका भोईर, ग्रामपंचायत सरपंच नम्रता कासार-खेडेकर, सदस्य संतोष राणे, सुनील दिवेकर, विलास दिवेकर, सरोज दिवेकर, ग्रामसेवक सुशांत ठाकूर, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गंभे,रा.जि.प.प्राथमिक शाळा मुख्याध्यापक प्रकाश नांदगावकर, शिक्षकवृंद, विद्यार्थी, सागरी सीमा मंच आशिष बुल्लू, काशिद बीच समुद्रकिनार्यावरील स्टॉल धारक, सुर्यकांत जंगम प्रशांत खेडेकर कर्मचारीवृंद व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
यावेळी काशिद बीच समुद्रकिनार्यावरील रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या, जाळी आदी 2500 किलो कचरा गोळा करण्यात येऊन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.