। वेनगाव । वार्ताहर ।
रेल्वे लाईनच्या स्फोटाने झालेल्या घरांची नुकसान भरपाई मिळावी, या मागणी साठी हालीवली ग्रामपंचायतिच्या सरपंच प्रमिला सुरेश बोराडे यांनी सुरु केलेले साखळी उपोषण प्रशासनाच्या आवाहनानुसार स्थगित करण्यात आले आहे. रेल्वे लाईनच्या कामात करण्यात आलेल्या स्फोटाने, त्या परिसरातील गावांतील झालेल्या घरांची नुकसान भरपाई देण्यात येईल असे आशयाचे पत्र रेल्वे प्रशासनाने कर्जत तहसीलदारांच्या मार्फत उपोषणाच्या दुसर्या दिवशी देण्यात आले. सदर मागणीची दखल घेऊन त्या आश्वासन पत्र दिले असल्याने उपोषण तूर्तास स्थगित करणेत आले आहे. या वेळेस अॅड. कैलास मोरे ,रमेश कदम , शिवसेनेचे दशरथ भगत , काशिनाथ शिंदे, बाळा गुरव, सुनील गायकवाड, प्रदीप ढोले, राजू ढोले, हालिवली व किरवली गावचे ग्रामस्थ व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.