। चिरनेर । प्रतिनिधी ।
गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली यांच्यावतीने प्रकाशझोतातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान येथील आझाद मैदानावर करण्यात आले होते. हे क्रिकेट सामने मुख्य आयोजक सुजित पाटील, गोमा पाटील, राहुल पाटील, सुधीर पाटील, रोहित पाटील, प्रशांत खारपाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या क्रिकेट सामन्यांमध्ये 32 संघानी भाग घेतला होता.
या ‘ग्रामस्थ मंडळ चषक 2025’च्या चषकाचे अजिंक्यपद देवद येथील अद्विक अँड टायगर इलेव्हन या संघाने पटकाविले आहे. त्यांना ग्रामस्थ मंडळ चषक व दीड लाख रुपये असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तर, उपविजेतेपद टेंभीवली येथील भूमी इलेव्हन क्रिकेट संघाने प्राप्त केले. त्यांना 75 हजार रुपये व चषक देण्यात आला. तसेच, आई गावदेवी इलेव्हन क्रिकेट संघ शिरवली संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यांना 35 हजार रुपये रोख व चषक देण्यात आला. तर, रोडपाली येथील साईराज इलेव्हन क्रिकेट संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला असून त्यांना 30 हजार रुपये रोख व चषक देण्यात आला.
या स्पर्धेतील मालिकावीर हा किताब मयूर वाघमारे (देवद) व परेश कडके (रोडपाली) यांना विभागून देण्यात आला. त्यांना मोटर सायकल देऊन गौरविण्यात आले. तर, सर्वोत्कृष्ट फलंदाज तैसीफ शेख (टेंभीवली), सर्वोत्कृष्ट गोलंदाज (देवद), तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक उल्हास मढवी (शिरवली) हा ठरला आहे. या सर्वांना पारितोषिक म्हणून स्पोर्ट्स सायकल देण्यात आली.