। रेवदंडा । वार्ताहर ।
अलिबाग ते मुरूड मुख्य रस्त्यावरील वाहतुक अवास्तव वाढलेल्या झाडांच्या विळख्यात असून, या अवास्तव वाढलेल्या झाडीने मोठ्या वाहनाच्या वाहतुकीस नित्याने अडथळा होत आहे.
अलिबाग व मुरूड तालुक्यातील वाहतुकीत झालेली वाढ, यामुळे वाहनांची संख्या वाढलेली असून, मिनिटागणीक वाहतूक या मुख्य रस्त्याने सुरू असते. अलिबाग, नागाव ते रेवदंडा परिसरात मुख्य रस्त्याच्या दुर्तफा बागायती आहेत, या बागायतीमधील अनेक झाडे मुख्य रस्त्यावर अवास्तवपणे वाढलेली आहेत. या अवास्तव वाढलेल्या झाडाने एकाच ठिकाणाहून दोन मोठी वाहने पास होताना, अडथळा येतो. तसेच अनेक झाडाच्या फांद्या रस्त्यावर येत असल्याने मोठ्या वाहनांना झाडांना चुकवताना मोठा प्रयास करावा लागतो.
तसेच मुरूड तालुक्यातील मुख्य रस्त्याला सुध्दा असेच अवास्तव वृक्ष ठिकठिकाणी वाढलेले दिसून येतात. विशेषतः रेवदंडा-साळाव पुलाअगोदर दोन्ही बाजूकडील मुख्य रस्त्यात अशीच अवास्तव वाढलेली वृक्ष मुख्य रस्त्याला मोकाट पसरलेली आहेत. येथून सुध्दा मोठ्या वाहनांना जा-ये करताना कसरत करावी लागते. वाढलेल्या अवास्तव वृक्षाच्या फांद्या खुपच खालवर मुख्यः रस्त्याला अगदी मधोमध आलेल्या आहेत. अनेकदा मोठ्या वाहनांना येथून प्रवास करताना अडथळा निर्माण होत असतो. मुख्य रस्त्याला वाढलेली अवास्तव वृक्षासोबत अलिबाग ते मुरूड मुख्य रस्त्याच्या साईडपट्टीवरसुध्दा झाडे मोकाटपणे वाढलेली दिसतात,. ही अवास्तव वाढलेली झाडे अगोदरच अरूंद असलेला रस्ता आणखीनच अरूंद बनवितात. त्यामुळे बाहेरील येणारी वाहनांचे वाहन चालक रस्त्याच्या कडेला वाहने नेण्यास घाबरतात. त्यामुळे दोन मोठ्या गाड्या पास होताना अथडळा निर्माण होतो. अलिबाग ते मुरूड वाढते पर्यटन व स्थानिक स्तरावरील वाढते उद्योग व्यवसायामुळे येथील वाहतुकीस मोठी वाढ झालेली दिसून येते. संबंधितानी अलिबाग ते मुरूड मुख्य रस्त्याच्या दुर्तफा वाढलेली अवास्तव वृक्ष तसेच साईडपट्टीवर आलेली अवास्तव झाडी झुडपे यांची तोड करून मुख्य रस्ता वाहतुकीस मोकळा ठेवावा अशी सर्व स्तरातून विशेषतः वाहन चालक व प्रवासीवर्गाकडून केली जात आहे.