हवामान खात्याचा इशारा
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहेत. येत्या पाच दिवसांत अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस बरसेल, असा अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सध्या चक्राकार वारे राजस्थान, मध्य प्रदेशात सक्रीय आहेत. 3, 4 आणि 5 मे रोजी विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडेल.







