| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना हा 6 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. तर 13 जूनपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.
भारतीय संघात विराट कोहली याच्या जागी ऋतुराज गायकवाड याचा समावेश केला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. टीम इंडियात विराट कोहली याच्या जागी ऋतुराज गायकवाड याचा समावेश केला जाऊ शकतो. विराटला दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर रहावं लागणार आहे. इंडिया ए टीम काही दिवसांनी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. ऋतुराजचा काही दिवसांआधी श्रीलंका दौऱ्यासाठी इंडिया ए टीममध्ये रियान पराग याच्या जागी समावेश करण्यात आला होता. ऋतुराजला उपकर्णधार म्हणून संधी देण्यात आली होती. मात्र आता ऋतुराज अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात असणार असा दावा केला जात आहे. त्यामुळे ऋतुराजच्या जागी इंडिया ए टीममध्ये कुणाला संधी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विराटला हॅम्स्ट्रिंगचा त्रास असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऋतुराजचं नाव विराटच्या जागेसाठी आघाडीवर आहे. ऋतुराजला संधी मिळाल्यास टीम इंडियाला दुहेरी फायदा होईल. एक म्हणजे फलंदाज मिळेल. दुसरा फायदा म्हणजे ओपनर म्हणून पर्याय मिळेल. दरम्यान ऋतुराजला विराटच्या जागी संधी मिळाल्यास इंडिया ए टीममधील 1 स्थान रिक्त होईल. त्यामुळे त्या जागी रजत पाटीदार याला संधी मिळण्याची शक्यता आहे.







