। वावोशी । वार्ताहर ।
वावोशी येथील विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरे करण्यात आले. शाळेच्या इयत्ता 1ली ते 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतासह विविध गीतांवर, विषयांवर आपली कला सादर केली. भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणार्या विषयांवर मुलांनी सुंदर कलाकृतीचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
या कार्यक्रमाला गोदरेज कंपनीचे व्यवस्थापक टी.डी. चव्हाण, प्रिया कोलारा, सुनील लोखंडे, मल्लम रामा मोहन, मोहन पाटील, प्रकाश हाके, एस. सी. महाजन, माजी एस.आर.बेडगे, आर. डी. गावित, एस.आर.पाटील, मानसी पाटील, अर्चना कटके, गिरीधर पिंगळे, महेश पाटील, रमेश पाटील, दीपा शिर्के, वृषाली शिर्के, अनिल मरागजे, विद्याधर जाधव, भालचंद्र पाटील, सुभाष पाटील, सलीम शेठ, जगदीश पाटील, दिपक पाटील तसेच परिसरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील प्रत्येकी एका वर्गास बेस्ट क्लास अवॉर्ड देण्यात आले. तसेच, वार्षिक क्रीडा महोत्सवात विशेष प्राधान्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना, कबड्डी व खो-खो या क्रीडास्पर्धामध्ये विजयी झालेल्या संघांना ट्रॉफी देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे कार्यक्रम, प्रत्येक विद्यार्थ्यावर शिक्षकांचे असलेले बारीक लक्ष, पालकांचा सहभाग यामुळे शाळेची लोकप्रियता वाढून उत्तरोत्तर प्रगती होताना दिसत येत आहे.
मुख्याध्यापिका मानसी पाटील,
विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, वावोशी