। चेन्नई । वृत्तसंस्था ।
आयपीएल सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनला एक विशेष सन्मान मिळाला आहे. अश्विनच्या मूळ गावी असलेल्या एका रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावर्षी अश्विनला पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. त्यानंतर आता पुन्हा त्याला सन्मानित करण्यात आले आहे. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनने शुक्रवारी त्यांच्या कौन्सिलच्या बैठकीत पश्चिम मंबालममधील रामकृष्णपुरम फर्स्ट स्ट्रीटचे नाव रविचंद्रन अश्विन रोड असे ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे. अश्विनच्या क्रिकेटमधील योगदानाचा सन्मान करण्यासाठी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे अश्विनचं घरही याच मार्गावर आहे.