| रोहा | वार्ताहर |
आगरी ज्ञाती समाज रोहा तालुक्याचे संस्थापक व शेतकरी कामगार पक्षाचे राजिपचे माजी सदस्य कै. चांगदेव निरकर यांच्या पत्नी आनंदीबाई चांगदेव निरकर यांचे मंगळवारी (दि. 11) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी (दि. 12) सकाळी धोंडखार गावातून निघणार आहे. कै. आनंदीबाई यांच्या पश्चात दोन मुले जीवन, मनोहर, एक मुलगी, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्योच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि रोहा तालुका आगरी समाजाकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.