। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील चिल्हे येथील उत्कृष्ठ माजी कबड्डीपटू अनंत लोखंडे यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. अनंत लोखंडे यांच्या निधनाची वार्ता समजताच रोहा तालुक्यासह सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा तसेच विविध क्षेत्रातील समाज बांधव त्यांच्या अंतीम विधीत सहभागी होत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, पुतणे, सूना, भावजय असा मोठा परिवार आहे. अनंत लोखंडे यांचे दशक्रिया विधी रविवारी (दि.29) तर उत्तर कार्य मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी चिल्हे येथील त्यांच्या राहत्या घरी संपन्न होणार आहे.