| नेरळ | वार्ताहर |
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नेरळ शिवसेना शाखेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शिवसेना शहर शाखेच्या शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तर महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त संतोष भोईर यांनी पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी शिवसेना संभाजी जगताप, सुरेश टोकरे, मंगेश म्हसकर, प्रसाद थोरवे, अंकुश दाभने, अंकुश शेळके, प्रभाकर देशमुख, किसन शिंदे, उषा पारधी, जान्हवी साळुंखे, वर्षा बोराडे, आबा पवार, नंदकुमार कोळंबे तसेच ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
त्यानंतर नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळा कन्या शाळा, कुंभार आळी शाळा, जुम्मपट्टी शाळा, टपाल वाडी शाळा आणि आनंद वाडी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. सायंकाळी नेरळ गावातील बापूराव धारप सभागृह येथे नेरळ महिला आघाडीकडून हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यात एक हजारहून अधिक महिलांनी सहभाग घेतला.