| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ गायिका आणि भूजनभूषण गजानन पाटील यांची कन्या सुचिता वांजळे यांच्या गायकी कलेचा सन्मान मैत्रीबोध परिवाराकडून नवी मुंबई येथील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित सोहळयात करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक महेश कोठारे, सिंघम चित्रपटाची नायिका काजल अग्रवाल यांच्या उपस्थितीत वांजळे यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळयाची सुरुवात गायिका वांजळे यांनाही मैत्रीबोध परिवाराचे प्रमुख दादाश्रीजी यांच्या वाढदिवसानिमित्त अभंग गायन झाली.